‘ऑटिझम’विरोधात लढणा-या पालक व प्रशिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी आगळे व्यासपीठ


तीन शहरांत होणाया परिसंवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर पालक  प्रशिक्षकांना संबोधित करणार

मुंबई, भारत – नोव्हेंबर 92015 – मुंबई, बेंगळुरू आणि नवी दिल्ली या तीन शहरांमध्ये डिसेंबरमध्ये होणा-या दोन दिवसांच्या एका परिषदेत ऑटिझम या विकारातील शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा साई कनेक्शन्स या ऑटिझम विकारावर काम करणा-या मुंबईस्थित संस्थेने आज येथे केली. ऑटिझम विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सल्लागार डॉ. रेशल शीले आणि डॉ. स्टीफन गुटस्टेन हे अमेरिकी आणि श्रीमती कामिनी लाखाणी या भारतीय डॉक्टर अशा मुलांच्या पालकांना सक्षम करतील आणि त्यांच्या मुलांच्या जीवनाचे ज्ञान सखोल करतील. या परिषदेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे- मुंबईत 5 व 6 डिसेंबर, बेंगळुरू 9 व 10 डिसेंबर आणि नवी दिल्ली 12 व 13 डिसेंबर 2015.

एखाद्या दुस-या व्यक्तीशी संवाद साधणे आणि त्यांच्याशी संभाषण करणे कठीण होते, अशा प्रकारच्या मेंदूतील विकाराला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर (एएसडी) म्हणतात. संवाद साधण्याच्या मेंदूच्या या मर्यादांची लक्षणे संबंधित व्यक्तीच्या सामाजिक संपर्कात, मौखिक व अमौखिक संभाषणात आणि अंतर्गत इच्छाशक्तीमध्ये दिसून येतात. मर्यादित आणि वारंवार एकच गोष्ट करणे यासारख्या लक्षणांद्वारे संबंधित व्यक्ती ही या विकाराला बळी पडलेली आहे किंवा नाही, ते निश्चित करते. ‘पीडीडी-एनओएस’ आणि ‘आस्पर्गर्स सिण्ड्रोम’ हे दोन विकार एएसडीमध्ये समाविष्ट केले गेले आहेत. संबंधित व्यक्तीची काही लक्षणे सौम्य असू शकतात; पण काही लक्षणे तीव्र स्वरूपाची असू शकतात.

साई कनेक्शन्सच्या संस्थापिका आणि प्रमाणित प्रशिक्षक कामिनी लाखाणी म्हणाल्या, “एखाद्या मुलात ऑटिझमचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले, तर त्याच्या पालकांची सर्वात कठीण परिस्थिती होते. ऑटिझमचा सामना करणे हे मोठेच आव्हान असून त्यात खूपच सहनशक्ती खर्च होते. आपल्या मुलाचे एखाद्या यंत्रमानवासारखे वर्तन तसेच त्याची आक्रमकता (ज्याला मेल्टडाऊन असेही म्हणतात) कमी करण्याचा आणि त्याची संभाषणकला, इतरांशी संपर्क साधण्याची क्षमता वाढविण्यासाठी पालक सर्व काही करतात. त्याला नोकरी मिळावी, यासाठीही धडपडतात. अर्थात अनेकदा पालक आणि प्रशिक्षकांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही अपत्याच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. कुठेतरी काहीतरी कमी पडत असल्याची भावना निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी, कोणतीही गोष्ट करण्यासाठी लागणाया प्रेरणेचा, वास्तवाच्या आकलनाचा, विचार करण्याच्या आणि समस्येवर उपाय शोधण्याच्या क्षमतेचा अभाव, हा जो ऑटिझमचा गाभा आहे, त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.”

पालकांच्या या समस्येवर या दोन दिवसांच्या परिषदेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे. गेली 20 वर्षे ऑटिझमचा अभ्यास केलेल्या तज्ज्ञ सल्लागारांशी पालक व व्यावसायिक प्रशिक्षकांना चर्चा करण्याची संधी मिळेल. त्यांच्या विशिष्ट समस्येबाबत त्यांना केवळ वक्त्यांकडूनच नव्हे, तर या विकाराला बळी पडलेल्या अन्य मुलांच्या पालकांकडून मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे या विकाराचा बळी ठरलेल्या मुलाशी कसे वागावे, याबाबत पालक आणि प्रशिक्षक अधिक सक्षम होतील. जगभर या विकारावर उपलब्ध झालेल्या आणि प्रत्यक्ष वापरातून सिध्द झालेल्या प्रभावी उपचारांची माहितीही त्यांना मिळेल. ही कार्यशाळा ऑटिझमबाबत तसेच शैक्षणिक क्षमतेच्या अभावाशी निगडित अन्य विकारांबाबत जागृती तर करीलच, पण संबंधित पालक आणि प्रशिक्षकांना या विकारातील काही न सापडणा-या गूढांची उकलही करून देईल.

अधिक माहितीसाठी संपर्क- विशाल कटारिया 9819027660.

# # #

साई कनेक्शन्सविषयी

‘साई कनेक्शन्स’ हे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर (एएसडी) विकाराला बळी पडलेल्या व्यक्तींना त्यावर मात करून आपले जीवन अधिक उपयुक्त आणि समाधानी करण्यास मदत करणारे तसेच ऑटिझमबद्दल जागृती करणारे आणि प्रशिक्षण देणारे मुंबईस्थित प्रशिक्षण केंद्र आहे. या विकाराच्या रुग्णाचे पालक व त्यांच्या भावंडांमध्ये अधिक व्यापक कौटुंबिक मूल्ये रुजविण्याचाही प्रयत्न ही संस्था करते. पालकांना ऑटिझमची माहिती करून देणे आणि त्याचे स्वरूप समजावून सांगणे तसेच त्यांना व त्यांच्या अपत्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचे काम ही संस्था गेले दशकभर करीत आहे. ज्यांच्या अपत्यांना हा विकार जडला आहे, त्यांचे पालक व अन्य कुटुंबीयांसाठी ‘साई कनेक्शन्स’ प्रशिक्षण कार्यक्रमही राबविते ज्यामुळे त्यांना आपल्या मुलाची माहिती चांगल्या प्रकारे होईल आणि रुग्णामध्ये सुधारणा होईल. ‘साई कनेक्शन्स’ एएसडीला बळी पडलेल्या तसेच त्याचेच उपप्रकार असलेल्या ‘पीडीडी-एनओएस’, ‘आस्पर्गर्स सिण्ड्रोम’ व अन्य विकारांवर उपचार करते. please visit  www.saiconnections.com

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: