अॅण्ड्रोइड फोन्समध्ये ‘आय फील सेफTM विथ पॅनिक बटन’ या सेवेची भर


  • अॅण्ड्रोइड फोन्समध्ये आय फील सेफ विथ पॅनिक बटन या नव्या सेवेची भर करण्यात आली आहे आणि सोबतच इतर सर्व फोन्ससाठी देखील ही सेवा लवकरच सुरु करण्यात येईल.
  • सामान्य माणसाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आता मोबाईल उत्पादकांना जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही
  • सरकारतर्फे नुकतीच सुचवण्यात आलेली पॅनिक बटनाची गरज हे एक स्वागतार्ह पाऊल आहे.
  • फोन लॉक असताना देखी ही सेवा काम करते.

नवी दिल्ली, भारत – ५ मे २०१६ – एक अग्रगण्य टेलीकम्युनिकेशन सोल्युशन्स आणि सर्विस प्रोव्हायडर असलेली एमएसएआय कंपनी मोबाईल उपकरणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण उपयोगी सेवा विकसित करण्याचे कार्य करते आणि आज या कंपनीने सर्व अॅण्ड्रोइड मोबाईल फोन्ससाठी आय फील सेफTM पॅनिक बटन या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवेची घोषणा केली आणि लवकरच ही सेवा इतर सर्व आधुनिक फोन्समध्ये उपलब्ध होईल असे देखील सांगितले. अॅण्ड्रोइड अॅप्पलीकेशनला मोबाईल फोनच्या हार्डवेअरची जोड देणारी आय फील सेफTM पॅनिक बटन ही एक क्रांतिकारी संकल्पना आहे. संपूर्ण भारतभरात महीलंवर, बालकांवर आणि इतर कोणत्याही मनुष्यावर होणारे हल्ले रोखण्याकरता सरकारतर्फे सुचवण्यात आलेल्या पर्यायाचा विचार करून ही संकल्पना त्वरित अंमलात आणण्यात आली. १ जानेवारी २०१७ पासून पॅनिक बटन हे अनिवार्य करण्यात येईल अशी घोषणा सरकारतर्फे नुकतीच करण्यात आली होती.

पोलिसांना सतर्क करण्यासाठी तुमच्या मोबाईल फोन वरील पॅनिक बटनाचा वापर करण्याकरिता तुम्हाला २०१७ वर्ष उजाडायची वाट पहावी लागणार नाही. आता तुम्ही तुमच्या कोणत्याही अॅण्ड्रोइड मोबाईलवरील पावर बटन सलग पाच वेळा दाबून आय फील सेफ™ हे अॅप्पलीकेशन मोबाईलवर सक्रीय करू शकता. सतर्कतेचा इशारा देण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचे लॉक उघडण्याची देखील गरज नाही. पॅनिक बटन दाबल्यानंतर ते एकदा सक्रीय केले की हे अॅप्पलीकेशन तुमच्या लोकशनच्या तपशीलासह एक निर्वाणीचा संदेश एसएमएसच्या माध्यमातून तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवेल आणि सोबतच हे अॅप्पलीकेशन एक अलर्ट कॉल म्हणून पोलीसांपर्यंत देखील तुमचा हा संदेश पोचता करेल. हे अॅप्पलीकेशन स्पष्ट रेखांश आणि अक्षांशाच्या समन्वयासह दर १ मिनिटांनी मॅपवर तुमचे ठिकाण देखील दर्शवण्यास सुरवात करेल, त्यामुळे तुम्ही ज्या संकटाच्या ठिकाणी अडकला आहात तेथपर्यंत पोहोचण्याचा अचूक मार्ग दाखवला जाईल. ज्या व्यक्तीकडे मोबाईल आहे ती व्यक्ति जोवर हे अॅप्पलीकेशन स्वतः बंद करत नाही तोवर हे वैशिष्ट्यपूर्ण अॅप्पलीकेशन संदेश देत राहील.

“आता महीलांची सुरक्षा त्यांचाच हातातील बटनामध्ये आहे’ हा संकटात सापडलेल्या व्यक्तीला जोडणारा एक डिजिटल प्रतिसाद आहे. आजच्या जवळ येणाऱ्या जीवनामध्ये सर्वात मौल्यवान असलेल्या साधनाचा म्हणजेच मोबाईल फोनचा वापर हा महीलांवरील गुन्हे, धमक्या, अपहरण इत्यादी रोखण्यासाठी अतिशय योग्य रीतीने होत आहे.” असे एमएसएआयच्या व्यवसाय प्रमुख, भावना कुमारी म्हणाल्या.

संभाव्य पिडीतांसाठी आय फील सेफ™ हे अगदी हातात मावण्यासारखे शस्त्र आहे.  जर त्यांना कोणत्याही संकटाचा मागमूस आला तर अॅण्ड्रोइड मोबाईल फोनचे पावर बटन पाच वेळा दाबल्यावर तुमच्या ठिकाणच्या अचूक रेखांश आणि अक्षांशाच्या तपशीलासह सायलेंट अलार्मच्या स्वरुपात पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांना आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही संकटात आहात असा संदेश मिळेल त्यामुळे ते तिथे वेळेवर पोहचू शकतील आणि गुन्हा रोखू शकतील.

भारतीय नागरिकांना नितांत गरज असताना त्यावेळी त्यांचे संरक्षण करावे या हेतूने एक कार्यक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी हा सातत्यपूर्ण समन्वय प्रयत्न पोलिसांना मदतच करत आहे.

तसेच हे पॅनिक बटन पोलिसांना तुमचे इमर्जन्सी संपर्क क्रमांक सुद्धा पुरवेल त्यामुळे पोलीस त्या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून संकटात असलेल्या व्यक्तीबद्दल एखाद्या प्रकारची आवश्यक माहीती मिळवू शकतात आणि शक्य तितक्या लवकर अतिशय वेगाने तासाभराच्या आत अचूक व्यक्तीपर्यंत ते सहज पोहचू शकतात. जर पोलीस घटनास्थळी तासाभराच्या आत वेगाने पोचणे शक्य झाले तर अनेक गुन्ह्यांचे प्रमाण हे यशस्वीरित्या रोखले जाऊ शकते.

भावना पुढे असेही म्हणाल्या की, “१६ डिसेंबर २०१४ रोजी  दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भायाच्या घटनेनंतर दोनच  दिवसांनी जेव्हा माझी मुलगी ‘अमुल्या’ जन्माला आली तेव्हाच मी स्वतः महीलांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी ठोस पाऊल उचलण्याचे ठरवले होते. एका बाजूला संपूर्ण भारताला सुन्न करणाऱ्या निर्भयासोबत घडलेल्या प्रसंगाने माझ हृदय अगदी पिळवटून निघाल होत आणि दुसरीकडे आमच्या कुटुंबाला देवाने दिलेली सुंदर भेट मी स्वीकारली होती. आशेने चमकणाऱ्या अमुल्याच्या डोळ्यांनी मला सामर्थ्य दिले आणि तेव्हाच मी महीलांच्या सुरक्षिततेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्याची शपथ घेतली होती.”

सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञान त्या वाढत्या मोबाईल क्षेत्राचे अविभाज्य घटक आहेत जे क्षेत्र या गौरवशाली देशाच्या करोडो नागरिकांना एकत्र बांधून ठेवते.

# # #

एमएसएआय बद्दल

एक अग्रगण्य टेलीकम्युनिकेशन सोल्युशन्स आणि सर्विस प्रोव्हायडर असलेली एमएसएआय कंपनी मोबाईल उपकरणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण उपयोगी सेवा विकसित करण्याचे कार्य करते. जगभरातील बहुतांश मोबाईल ब्रँड आणि उत्पादक एमएसएआयच्या सेवांचा लाभ घेतात.

एमएसएआय कंपनीला आयएसओ 9001 गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणेची, आणि आयएसो/आयईसी 27001 माहीती सुरक्षा व्यवस्थापन यांची मान्यताप्राप्त आहे. त्याचबरोबर आयएमईआयवर आधारित मोबाईल सॉफ्टवेअर सेवा विकसित करण्यात, त्यांचे वितरण करण्यात आणि एकत्रीकरण करण्यात देखील एमएसएआय कंपनी प्रसिद्ध आहे. सरकार, डिव्हाईस व्यस्थापन कंपनी (डीएम), नेटवर्क ऑपरेटर्स, ब्रँड मालक आणि ग्राहक यांच्यासाठी एमएसएआयने आवश्यकतेनुसार सेवा (कस्टम मेड सोल्युशन्स) निर्माण करून दिल्या आहेत.

एमएसएआयकडे १०० पेक्षा अधिक सदस्य असलेली टीम आहे जी मोबाईल इकोसिस्टममध्ये स्टेट ऑफ आर्ट, रोबस्ट, स्केलेबल सेवा प्रदान करण्यासाठी काम करते. एमएसएआयचे मुख्य कार्यालय हे दिल्लीस्थित असून चीन, अमेरिका या देशामध्ये देखील त्यांची कार्यालये आहेत. अधिक माहीतीसाठी कृपया www.msai.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: