आदित्य भंडांरी यांनी स्वीकारले नेतृत्व; ते झाले डीबीएस बिझनेस सेंटर्सचा नवा चेहरा


डीबीएस कुटुंबातील शेंडेफळ अदित्य भंडारी यांनी महत्त्वाच्या बदलांचा सुकाणू आणि मोठी जबाबादारी स्वीकारली असून हा व्यवसाय पुढील पातळीवर नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

मुंबई, भारत १७ मे २०१७ – डीबीएस बिझनेस सेंटर्स ही विविध प्रकारच्या आणि चोखंदळ ग्राहकांना योग्य ऑफिस सोल्युशन्स पुरविणारी फर्म असून या फर्मच्या संचालक मंडळामध्ये श्री. आदित्य भंडारी यांची मौल्यवान भर पडली आहे. आदित्य हे डीबीएसचा नवा तरूण चेहरा असून व्यवसायाच्या सर्व अंगांमध्ये अमूल्य योगदान देतील. सध्या ते भारतभरातील वित्त आणि बिझनेस ऑपरेशन्स या विभागांमध्ये आपले सर्वांगीण कौशल्य उपलब्ध करून देत आहेत. कंपनीचे दैनंदिन कामकाज सांभाळणे आणि कंपनीच्या व्यवहारांना दिशा दाखवून व त्यावर देखरेख ठेवून कंपनी अधिकाधिक समृद्ध होत जाईल, याची खातरजमा करणे ही त्यांची जबाबदारी आहे.

या कंपनीचा तरुण चेहरा म्हणून प्रतिनिधित्व करता आल्याबद्दल उत्साहात असलेले डीबीएसचे संचालक श्री. आदित्य भंडारी म्हणाले, “व्यवसायांना विनाअडथळा व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना उत्पादकता, विश्वासार्हता आणि नफानिर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्यास सहकार्य करणाऱ्या डीबीएसचा प्रातिनिधिक चेहरा होणे हा सन्मान आहे. ऑफिस बिझनेस सेंटरमध्ये लवचिकपणा आणि वाजवी किंमत हे दोन कळीचे घटक असतात, यावर डीबीएसमध्ये आमचा विश्वास आहे. अॅक्सेसेबिलिटी, अफोर्डेबिलिटी, अव्हेलेबिलिटी हे ३ए आमच्या क्लायंट्सना उपलब्ध होतील याची आम्ही खातरजमा करतो. आम्ही एक तास, एक दिवस, एक महिना किंवा त्याहून अधिक काळासाठी बिझनेस सेंटर उपलब्ध करून देतो. त्याचप्रमाणे आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार ही सेंटर्स तयार करतो. तुम्ही सांगा, आम्ही करून देतो.

आदित्य दोन वर्षांपूर्वी २०१४ साली डीबीएसमध्ये रुजू झाले आणि लवकरच त्यांनी डीबीएसचे सकारात्मक दृष्ट्या प्रतिनिधित्व केले आहे. या क्षेत्रातील बिझनेस आणि वित्त व्यवस्थापन, ग्राहककेंद्री सेवा, मार्केटिंग आणि संचालन व्यवस्थापनातील त्यांचा व्यापक अनुभव यामुळे कंपनीचा चेहरा होण्यासाठी त्यांची निवड होणे स्वाभाविक होते.

संचालक मंडळाने नेहमी केलेले सहकार्य आणि दृढ विश्वास याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. डीबीएसचे प्रतिनिधित्व करण्याबाबत मी अत्यंत उत्साही आहे. माझा अनुभव आणि ज्ञान यांचा उपयोग करून मी कंपनीला एका नव्या उंचीवर घेऊन जाईन., अशी पुष्टी त्यांनी जोडली.

तीन दशकांपूर्वी डीबीएसने इन्स्टंट ऑफिसेसची संकल्पना सर्वप्रथम सुरू केली. व्यावसायिक केंद्रांना आणि उद्योजकांना संपूर्ण फर्निशिंग केलेली आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी कार्यालये भारतातील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी आहे हे डीबीएसने ओळखले. आज भारतातील सर्व प्रमुख महानगरांमध्ये डीबीएसच्या कार्यालयांचे जाळे आहे. ही बिझनेस सेंटर्स अभिरुचीपूर्ण आहेत आणि या सेंटर्सना अभिजातपणाचा स्पर्श असल्यामुळे ती उठून दिसतात. या कार्यालयांमधील जागा लवचिक (फ्लेक्सिबल) आहेत आणि त्या ठिकाणी विविध गरजांनुसार विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील व्यावसायिक कर्मचाऱ्यांकडून बारकाव्यांकडे लक्ष दिले जाते, किंबहुना ते त्यासाठी प्रसिद्ध आहेत. जागतिक व्यवसाय कार्यपद्धतीच्या वेगाची डीबीएसला जाणीव असून संस्था/व्यवसायांच्या गरजांनुसार त्यांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. अद्ययावत तंत्रज्ञान, आधुनिक सुविधा आणि वैयक्तिक स्पर्श ही डीबीएस ब्रँडची प्रमाणचिन्हे आहेत.

क्विक बाईट्स:

आदित्य भंडारी

आदित्य हे युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅमचे बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट या विषयाचे पदवीधर आणि लंडन बिझनेस स्कूलचे पदव्युत्तर पदवीधर आहेत.

आदित्य या व्यवसायात नवीन असले तरी आपले व्यावसायिक ज्ञान, वैयक्तिक कौशल्ये आणि वारशाने लाभलेली बुद्धिमत्ता यांची सांगड घालत आपला कौटुंबिक व्यवसाय पुढील पातळीवर नेण्यास ते सज्ज आहेत.

आदित्य आपल्या कामाबद्दल अत्यंत प्रेरित आहेत आणि ते तळमळीने काम करणारे आहेत. त्यांच्यावर दिलेली नवी जबाबदारी पेलण्यास ते खंबीर आणि समर्थ आहेत.

डीबीएस बिझनेस सेंटर्स

डीबीएस ऑफिस बिझनेस सेंटर्सचे अध्यक्ष श्री. शामसुंदर अगरवाल यांनी १९८० साली इन्स्टंट ऑफिसेस या संकल्पनेची सुरुवात केली.

श्री. शामसुंदर अगरवाल, व्यवस्थापकीय संचालक श्री. परवीझ अगरवाल आणि संचालक श्रीमती वनिता भंडारी या दर्जा व उत्कृष्टता साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

जेव्हा डीबीएस बिझनेस सेंटर्सची सुरुवात झाली, त्या काळी कॉर्पोरेट इंडियासाठी बिझनेस सेंटर्सची संकल्पना नवीन होती. पण, बदलत्या काळानुसार उद्योजक आणि कॉर्पोरेट हाऊसेसना पारंपरिक कार्यालयांच्या तुलनेत बिझनेस सेंटर्सच्या लाभांची जाणीव होऊ लागली.

भारतातील सुविधायुक्त कार्यालयीन जागांच्या क्षेत्रात डीबीए अग्रणी आहेत आणि जगभरात त्यांचे अनेक प्रतिष्ठित क्लायंट्स आहेत.

# # #

डीबीएसबद्दल

३० वर्षांचा अनुभव आणि इन्स्टंट ऑफिसेस या संकल्पनेचे जनक असलेली डीबीएस बिझनेस सेंटर्स ही अंतर्दृष्टी असलेल्या कंपन्या आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तींची टीम आहे. त्यांचे उत्कृष्ट सौंदर्य आणि वैयक्तिक सेवांच्या स्पर्शामुळे ही फर्म इतरांपेक्षा वेगळी ठरते. डीबीएसची भारतातील प्रमुख शहरांमध्ये तेथील संबंधित व्यावसायिक ठिकाणी कार्यालये आहेत. ही फर्म अलायन्स बिझनेस सेंटर नेटवर्कशी (एबीसीएन) संलग्न असल्यामुळे डीबीएसच्या सदस्यांना जगभरातील ६०० हून अधिक ठिकाणी अॅक्सेस मिळतो. अधिक माहितीसाठी http://www.dbsindia.com/या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: